Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत ढीवरे यांनी स्वीकारला पदभार
    ताज्या बातम्या

    नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत ढीवरे यांनी स्वीकारला पदभार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 21, 2026Updated:April 21, 2026No Comments342 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव – जिल्हा पोलीस दलात आज पदभार हस्तांतरण सोहळा संपन्न झाला. जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत ढीवरे यांच्याकडे जिल्ह्याची सूत्रे सुपूर्द केली. या सोहळ्यानिमित्त जळगाव पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    मावळते पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना यावेळी भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, गुन्हेगारीवर मिळवलेला वचक आणि राबवलेले विविध जनहितार्थ उपक्रम यांचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. पोलीस दलातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सहकाऱ्यांनी त्यांच्याबद्दल आदराची भावना व्यक्त केली. नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत ढीवरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जळगाव पोलीस दलाच्या परंपरेनुसार त्यांचे स्वागत करण्यात आले. श्रीकांत ढीवरे यांच्या अनुभवाचा जिल्ह्याला मोठा फायदा होईल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव पोलीस दल अधिक सक्षम, पारदर्शक आणि गतिमान होऊन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी विविध विभागांना भेटी देत माहिती जाणून घेतली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif