Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»नवनियुक्त सीर्इओ करिश्मा नायरांनी पदभार स्वीकारला
    जळगाव

    नवनियुक्त सीर्इओ करिश्मा नायरांनी पदभार स्वीकारला

    प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी थेट संवाद
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 10, 2026Updated:April 10, 2026No Comments212 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव

    जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार आज करिश्मा नायर यांनी औपचारिकरित्या स्वीकारला. सकाळी साडेदहा वाजता जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील आपल्या दालनात त्यांनी कार्यभार हाती घेताच कामकाजाला सुरुवात केली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते त्यांना पदभार सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

    माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची मुंबई येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अभियान संचालक पदावर बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या यापूर्वी नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. पदभार स्वीकारल्यानंतर करिश्मा नायर यांनी तात्काळ ॲक्शन मोडमध्ये कामकाज हाती घेतले. त्यांनी जिल्हा परिषदेच्या नवीन व जुन्या अशा दोन्ही प्रशासकीय इमारतींमधील सर्व विभागांना भेटी देत प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेतला. प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी त्यांच्या टेबलवर जाऊन माहिती जाणून घेतली तसेच कामकाजाबाबत आवश्यक मार्गदर्शनही केले.

    या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. करिश्मा नायर यांच्या या सक्रिय आणि सकारात्मक कार्यपद्धतीमुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्षपदी संध्या कांकरिया

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif