tres amigos coupons austin tx industrial shirts coupon code huggies wipes coupons december 2015 birthday gifts for soldier boyfriend quality classrooms coupons
Thursday, December 1, 2022

संतापजनक; शौचालयाच्या भांड्यात आढळला नवजात बालिकेचा मृतदेह…

- Advertisement -

 

- Advertisement -

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

- Advertisement -

शहरातील चाळीसबिघा परिसरातील गोजिरी हॉस्पिटल मध्ये अज्ञात व्यक्तीने हॉस्पिटलमधल्या संडासाच्या भांड्यामध्ये नवजात बालिकेला टाकून दिल्याची घटना दि. 28 ऑगस्ट 2022 रविवार रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. नवजात बालिका ही अनोळखी असुन मृतावस्थेत आढळून आली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी गोजिरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रफुल वासुदेव पाटील यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तोंडी फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात व्यक्ती विरोधात अपराध नंबर 363/22 कलम 318 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपास पो.उप.नि.सुरेश रोकडे यांनी केला असुन, सदर मुलीचे प्रेत ओळख पटविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले असुन पुढील तपास पो.काॅ. अमोल शेले करीत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या