आरोग्यनीती; न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स’च्या अत्याधुनिक संदर्भ प्रयोगशाळा आणि ऑन्कोपॅथोलॉजी केंद्राचे उदघाटन 

0

लोकशाही विशेष लेख

 

न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स ही भारतामधील सर्वोच्च ४ पॅथॉलॉजी लॅबोरेटरी शृंखलांपैकी एक असून २०० हून अधिक प्रयोगशाळा (लॅबोरेटरीज) आणि २००० पेक्षा अधिक संग्रह केंद्र (कलेक्शन सेंटर) सह भारत(India), दक्षिण आफ्रिका (South Africa), यूएई (UAE) आणि अमेरिकेत (America), अस्तित्वात असून मुंबईतील दहिसर, चेंबूर आणि विद्याविहार येथे तीन प्रादेशिक संदर्भ प्रयोगशाळा आणि सर्वोत्तम ऑन्कोपॅथोलॉजी केंद्र लॉन्च करण्यात आले. प्रयोगशाळांचे उदघाटन माननीय उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी न्यूबर्ग डायग्नोस्टीक्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. जीएसके वेळू न्यूबर्ग, अजय शहा लॅबोरेटरीज’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शहा, तांत्रिक संचालक डॉ राजेश बेंद्रे, अध्यक्ष आणि प्रमुख डॉ. जय मेहता उपस्थित होते.

न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स’ने दहिसर येथे लॅबोरेटरी सुरू करण्यासाठी एक जुने आणि अग्रगण्य वैद्यकीय निदान संपर्कजाळे डॉ अजय शहा समवेत भागीदारी केली असून चेंबूरमध्ये मोठी एकल संदर्भ प्रयोगशाळा (Standalone Reference Lab) ची उभारणी केली आहे. दहिसर आणि चेंबूर येथील नवीन प्रयोगशाळा विस्तृत प्रकारच्या चाचण्यांची प्रक्रिया करण्यासाठी सज्ज असून दिवसाला सुमारे ५००० नमुने हातळण्याची त्यांची क्षमता आहे. या प्रयोगशाळा सर्वोत्तम गुणवत्ता राखत सुनिश्चित वेळेत निदान परिणाम उपलब्ध करून देतात. घरी भेट देणे, नोंदणी आणि अन्य सेवांसाठी आमच्याकडे ९७००३६९७०० या टोल-फ्री क्रमांकावर सेवेचा लाभ घेण्यासाठी चौकशी करा.

Leave A Reply

Your email address will not be published.