नवी दिल्ली वृत्तसंस्था
मोदी सरकारनं पॅनकार्डविषयी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता पॅन कार्डमध्ये QR कोड असणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार पॅन कार्डचं हे नवं व्हर्जन असणार आहे. तर त्याचं नाव PAN Card 2.0 असेल. हे तसंच असेल पण त्याच नवे फिचर्स असतील. लोकांच्या पॅन नंबरमध्ये कोणताही बदल होणार नाही. तुमच्या पॅन कार्डचा नंबर तोच राहणार. या कार्डवर एक क्यूआर कोड असेल. याला स्कॅन केल्यानंतर करदात्यांची सगळी माहिती समोर येईल. QR कोड असलेल्या या पॅन कार्डमधून कर भरणं, कंपनीचं रजिस्ट्रेशन करणं, बॅंकेत खातं सुरु करण्याची काम अगदी सोप्या पद्दतीनं होतात.
तुम्हाला नवं पॅन कार्ड मिळणार. ज्यांच्याकडे पॅन कार्ड आधीपासून आहे. त्यांना नव्या पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज नाही किंवा कोणताही फॉर्म भरण्याची देखील गरज नाही. नवं पॅन कार्ड तुमच्या घरी पोहोचवण्यात येईल. याचाच अर्थ तुमचं पॅन कार्ड हे ऑटो अपडेट होणार आहे.
अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्युआर कोड असल्यामुळे पॅन कार्ड धारकांची फसवणूक होणार नाही आणि आर्थिक सुरक्षेचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
अश्विनी वैष्णव यांच्यानुसार, पॅन कार्ड ऑपरेट करणारं सॉफ्टवेअर 15 ते 20 वर्ष जूनं झालं आहे. या सॉफ्टवेअरमुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे या पॅन कार्ड सिस्टमला डिजीटली तयार करण्यात आलं आहे. जेणे करून कोणतीही तक्रार, ट्रान्जॅक्शन, कर फायलिंग सारख्या गोष्टींची खूप लवकर प्रोसेस करु शकतात. त्याशिवाय नवीन पॅन कार्ड सिस्टममधून फसवणूक करता येणाल नाही किंवा खोटं पॅन कार्ड बनवता येणार नाही. नवीन सिस्टमची गरज यामुळे झाली करण भविष्यात पॅन कार्ड हे यूनिव्हर्सल आयडी म्हणून वापरता येणार आहे.