Saturday, December 3, 2022

डिजिटल मीडियाच्या नोंदणीसाठी देशात लवकरच येणार नवा कायदा

- Advertisement -

 

- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

- Advertisement -

- Advertisement -

प्रथमच डिजिटल मीडियाच्या नोंदणीसाठी नवीन कायदा आणण्यात येणार असून, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून प्रेस व नियतकालिकांच्या नोंदणी विधेयकात सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या नव्या विधेयकात डिजिटल न्यूज मीडियाचाही समावेश करण्यात येणार आहे. देशात डिजिटल न्यूज मीडियासाठी हा पहिलाच कायदा असेल. हा कायदा संमत झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत वेबसाईटची नोंदणी करावी लागणार आहे.

वेबसाईट प्रकाशकांना आपल्या वेबसाईटची नोंदणी प्रेस रजिस्टार जनरल यांच्याकडे करावी लागेल. तसेच कोणत्याही वेबसाईटवर

कारवाई करण्याचे अधिकारही त्यांच्याकडेच असतील. त्यानुसार ते कोणत्याही वेबसाईटची मान्यता रद्द करू शकतात अथवा त्यांना दंड ठोठावू शकतात. त्यासोबतच तक्रार निवारणासाठी मंडळदेखील स्थापन करण्यात येणार आहे. त्याचे प्रमुख हे प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे मुख्य अधिकारी असतील.

यापूर्वी डिजिटल न्यूज मीडियावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर बंधने नव्हती. मात्र, हे सुधारणा विधेयक संमत झाल्यानंतर सर्व न्यूज वेबसाईट या कायद्याच्या चौकटीत येणार आहेत. २०१९ मध्ये सरकारने या कायद्याचा मसुदा तयार केला होता. त्यावरून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या