नवे जिल्हाधिकारी अमन मित्तल आजच पदभार स्वीकारणार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची नांदेड जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी लातूर महानगपालिका आयुक्त अमन मित्तल यांची नियुक्ती झाल्याचे आदेश रात्री उशिरा प्राप्त झाले. याबाबतचे आदेश प्रधान सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांच्याकडून जारी करण्यात आले.

बदलीचे आदेश मिळताच अभिजित राऊत यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांचेकडे आपला पदभार सोपवून ते तातडीने नांदेडला रवाना झाले आहेत. तसेच दैनिक लोकशाहीने नूतन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याशी संपर्क साधला असता ते कोल्हापूरवरून जळगावकडे निघाले असून दुपारी दोन वाजेच्या सुमारास जळगावला पोहचणार आहेत. तर दुपारी तीन वाजेच्या सुमारास मित्तल हे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्याकडून जळगाव जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारतील.

नूतन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचा परिचय

नूतन जिल्हाधिकारी अमन मित्तल हे 2015 बॅचचे जिल्हाधिकारी असून त्यांची आजवरची कारकीर्द उत्तम राहिली आहे. मित्तल यांनी नाशिक, कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर मनपा आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. महापूर काळात आणि कोरोना काळात त्यांनी आघाडीवर राहून काम केले होते. जळगाव जिल्ह्याला सलग दुसर्‍यांदा तरुण, तडफदार अधिकारी लाभले आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.