Thursday, August 11, 2022

नवीन गॅस कनेक्शन घेणं महागणार ! पेट्रोलियम कंपन्यांचा मोठा निर्णय

- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे, त्यातच आता एक नवीन झटका बसला आहे. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने दिलेल्या माहितीनुसार,नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

यापूर्वी नवे सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी 1450 रुपये मोजावे लागत होते. मात्र उद्यापासून म्हणजेच १६ जूनपासून नागरिकांना 750 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

पेट्रोलियम कंपन्यांनी 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या नवीन कनेक्शनमध्ये प्रति सिलेंडर 750 रुपयांची वाढ केल्याने यासाठी 2200 रुपये द्यावे लागतील .  जर दोन सिलिंडर कनेक्शन घेतले तर तुम्हाला 1500 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.  म्हणजेच, यासाठी एकूण 4400 रुपये सिक्युरिटी रक्कम म्हणून भरावे लागतील.

महत्वाचे म्हणजे  रेग्युलेटरसाठी सुद्धा आता 150 रुपयांऐवजी 250 रुपये द्यावे लागतील. उद्या १६ जून पासून हे नवीन दर लागू होतील अशी माहिती पेट्रोलियम कंपन्यांनी दिली आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या