ईडी सहाय्यक संचालकाला लाच घेताना अटक

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क 

सध्या राजकीय वर्तुळामध्ये ईडी या नावानेच भल्याभल्या नेत्यांना घाम फुटत आहे. ईडीच्या धाडी पडल्याने अनेक नावाजलेल्या राजकारण्यांना तुरुंगवारी झाली असून अजूनही काही जण गजाआड आहेत. परंतु देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत लाचखोरीच्या प्रकरणात लाच घेताना ईडीचा मोठा अधिकारी पकडला गेल्याने नवी दिल्लीच्या वर्तुळात ‘शिकारी खुद्द यहाँ शिकार बन गया’ असे बोलले जाऊ लागले आहे.

गेल्या काही वर्षात देशभरातील सीबीआय आणि ईडीची कारवाई हा विषय चांगलाच चर्चेत राहिला आहे. सीबीआय आणि ईडीच्या कारवाईसंदर्भात अनेकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले. मात्र, आता केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने ईडीच्या सहाय्यक संचालकालाच लाचखोरीच्या प्रकरणात अटक केल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत तब्बल 20 लाखांची लाच घेताना ईडीच्या सहाय्यक संचालकाला अटक करण्यात आली आहे. ईडीच्या सहाय्यक संचालकाला लाच घेताना अटक करत सीबीआयने मोठी कारवाई केली. संदीप सिंह यादव असे अटक करण्यात आलेल्या ईडी अधिकाऱ्याचे नाव आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.