नेपाळमध्ये विमानाचा भीषण अपघात ; ३० हुन अधिक प्रवासी ठार ?

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

नेपाळमध्ये एक भीषण विमान अपघात झाला असून या अपघातात ३० हुन अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान अपघातात १६ जणांचे मृतदेह काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यती एअरलाइन्सचे एक विमान 68 प्रवाशी व 4 क्रू सदस्यांसह राजधानी नेपाळहून पोखराला जात होते. पण पोखरा विमानतळावर उतरताना ते अचानक क्रॅश झाले. ATR-72 प्रकारचे हे विमान कोसळल्यानंतर पेटले. या अपघातात नेमक्या किती जणांचा मृत्यू झाला हे अजून स्पष्ट झाले नाही. पण स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, आतापर्यंत विमानातून 30 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

विमानतळ प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, फ्लाइटमध्ये ५३ नेपाळी, पाच भारतीय, चार रशियन, दोन कोरियन, प्रत्येकी एक आयरिश, अर्जेंटिनियन आणि फ्रेंच नागरिक होते.

अपघाताबाबत माहिती देताना यती एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बारतौला यांनी सांगितले की, यती एअरलाइन्सच्या विमानात एकूण ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. त्यात दोन मुलांसह 10 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान हे विमान कोसळले. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, आतापर्यंत 16 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

नेपाळच्या स्थानिक मीडियानुसार, या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे. काही अहवालांमध्ये 30 जणांचे मृतदेह बाहेर काढल्याचा दावा केला जात आहे. त्याच वेळी, सुमारे 15 मृत्यूची नोंद आहे. मात्र, विमान कंपन्या आणि सरकारकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.
दरम्यान खराब हवामानामुळे विमान एका डोंगराला धडकले. क्रॅश होताच त्यात मोठा स्फोट होऊन ते पेटले.

Leave A Reply

Your email address will not be published.