अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि अपहरण… शेजारी अटकेत.!

 

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क;

घरात कपडे बदलणाऱ्या अल्पवयीन मुलीला जीवेमार्ण्याची धमकी देऊन शेजार्याने केला बलात्कार. पुण्याच्या गुलटेकडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने वारंवार बलात्कार केला. याप्रकरणी आता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसंच आरोपीला अटकही करण्यात आली आहे.

19 फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी तिच्या शाळेत शिवजयंतीनिमित्त आयोजित नाटकात सहभागी झाली होती. यानंतर जेव्हा ती घरी परतली आणि आपली कपडे बदलू लागली तेव्हा आरोपी तिच्या घरात घुसला. आरोपीने अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जुलै महिन्यात आरोपी आणि त्याच्या मित्राने बळजबरीने या मुलीचं अपहरण करून तिला मुंबईत ठेवलं. स्वारगेट पोलिसांनी सांगितलं की आम्ही या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवलं आहे. ‘उपचारादरम्यान मुलीने सांगितलं की, तिच्या शेजाऱ्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे’, असंही पोलिसांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here