मोठी कारवाई : NTA च्या महासंचालकाची हकालपट्टी

पेपर लीक केल्यास 10 वर्षे तुरुंगवासासह 1 कोटींचा दंड

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क 

नीट आणि नेट परिक्षेतील गैरप्रकारानंतर केंद्र सरकारने मोठी कारवाई केलीय. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या प्रमुखांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी निवृत्त आयएएस अधिकारी प्रदीप सिंह खरोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खरोला हे कर्नाटक कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. दोषमुक्त प्रवेश परीक्षा घेण्यासाठी 2018 साली एनटीएची स्थापना करण्यात आली होती. परंतू ही संस्था सध्या अपयशी ठरली आहे. NEET परीक्षे मधील कथित गैरव्यवहाराचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. तसेच राष्ट्रीय चाचणी संस्थेचे (NTA) महासंचालक सुबोध कुमार सिंग यांना पदावरून हटवण्यात आलं

एजन्सीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आणि परीक्षा सुधारणांची शिफारस करण्यासाठी सरकारने इस्रोचे माजी प्रमुख के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. तर निवृ्त्त आयएएस अधिकारी प्रदीप सिंह खरोला यांची एनटीएचे नवे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

NEET-PG प्रवेश परीक्षा स्थगित

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही स्पर्धात्मक परीक्षांसंदर्भात अलीकडेच झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून NEET-PG प्रवेश परीक्षा एका रात्री पुढे ढकलण्याची घोषणा केली. CSIR आणि UGC-NET ची जून आवृत्ती रद्द झाल्यानंतर एक दिवसानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आणि विज्ञान विषयातील पीएचडीसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी संयुक्त CSIR-UGC-NET परीक्षा घेतली जाते.

 

अँटी पेपर लीक कायदा लागू

पेपरफुटी रोखण्यासाठी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. 21 जून 2024 (शुक्रवारपासून) केंद्र सरकारने सार्वजनिक परीक्षा कायद्याच्या तरतुदी लागू केल्या आहेत. त्या अंतर्गत परीक्षेत होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी किमान 3 ते 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तर पेपर लीक करणाऱ्यांना 5 ते 10 वर्षे तुरुंगवास आणि किमान 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाईल अशी तरतूद करण्यात आली आहे. संसदेने सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 हा फेब्रुवारी महिन्यात मंजूर केला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.