Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»लोकशाही विशेष»नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण ‘महाराष्ट्रासाठी नामुष्की’!
    लोकशाही विशेष

    नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण ‘महाराष्ट्रासाठी नामुष्की’!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 29, 2026No Comments89 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही विशेष लेख

    राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने आणखी एका क्लास चालक व त्याच्या मुलाला अटक केल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली. नीट पेपरफुटीचा तपास करणाऱ्या सीबीआयकडून आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली असून, त्यात अनेक मोठे मासे त्यांच्या गळाला लागले आहेत. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असल्याने आणखी मोठे मासे सीबीआयच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. तसेच अनेक धक्कादायक खुलासेही समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    सीबीआयने नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्या १३ आरोपींपैकी १० आरोपी हे महाराष्ट्रातील असल्याने या पेपरफुटीचे कनेक्शन महाराष्ट्राशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात ही महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही, तर अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. लातूरमधील रसायनशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी हे या पेपरफुटीमागचे मास्टरमाईंड असल्याचे पुढे आले आहे. त्यांच्यासोबतच जीवशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांनाही सीबीआयने अटक केली आहे.

    महाराष्ट्रातील पुणे, नांदेड, लातूर, नागपूर, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचे या घोटाळ्याशी थेट कनेक्शन आढळून आले आहे. विशेष म्हणजे, विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. मनीषा गुरुनाथ मांढरे, मनीषा संजय हवालदार, पी. व्ही. कुलकर्णी, तेजस शाह आणि डॉ. मनोज शिरुरे अशी पुण्यातून अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर लातूरमधून शिवराज मोटेगावकर, अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडे आणि नाशिकमधून शुभम खैरनार यांना अटक करण्यात आली आहे.

    विशेष म्हणजे, अटक झालेले सर्व आरोपी उच्चशिक्षित डॉक्टर, प्राध्यापक आणि क्लास चालक आहेत. लाखो रुपये पगार घेऊन प्राध्यापकी करणारे आणि समाजात ज्यांना देवमाणूस म्हणून मान दिला जातो, अशा डॉक्टरांकडून अशा घटना घडणे अत्यंत धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक परंपरेला काळिमा फासणाऱ्या या घटना आहेत. कोट्यवधी रुपये मिळवण्याच्या लालसेपोटी हे उच्चशिक्षित लोक गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत.

    केंद्रीय शिक्षण विभागाचेही हे मोठे अपयश आहे. नीट पेपरफुटीमुळे शिक्षण विभागाचे लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत. सर्वसामान्य नागरिकांचा आणि विद्यार्थ्यांचा परीक्षेवरील विश्वासच उडाला आहे. अर्थात, नीटसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेचा पेपर फुटण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील दहा वर्षांत विविध परीक्षांच्या पेपरफुटीच्या शेकडो घटना घडल्या आहेत. त्यामुळे परीक्षांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    नीटसारख्या वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश देणाऱ्या परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी दोन-दोन वर्षे प्रचंड मेहनत घेतात. रात्रंदिवस अभ्यास करून डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र कुलकर्णी, मोटेगावकर यांच्यासारखे लोक त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचे काम करतात. गोरगरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वप्न हिरावून घेणाऱ्या या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.

    याआधीही असे प्रकार घडले होते. त्यावेळी काही आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांच्यावर जरब बसेल अशी कठोर कारवाई झाली नाही. त्यामुळेच असे घोटाळे पुन्हा पुन्हा घडत आहेत. कोणतेही गुन्हे केले तरी पैशाच्या जोरावर आपण सहज सुटू शकतो, अशी भावना या गुन्हेगारांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळेच ते विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचे धाडस करत आहेत.

    केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली असली, तरी ती पुरेशी नाही. केंद्र सरकारने या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या प्रत्येक आरोपीवर, मग तो कितीही मोठा किंवा पैसेवाला असो, कठोर कारवाई केली पाहिजे. जोपर्यंत या लोकांवर जरब बसेल अशी शिक्षा होत नाही, तोपर्यंत अशा घटना थांबतील असे वाटत नाही.

    यातील सर्वाधिक आरोपी महाराष्ट्रातील असल्याने महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. महाराष्ट्रासाठी ही एक प्रकारची नामुष्कीच आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे.

    श्याम ठाणेदार
    दौंड, जिल्हा पुणे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा

    September 9, 2026

    डिजिटल क्रांती : समृद्ध शेतीचा पाया/ ‘स्मार्ट शेती, भरघोस प्रगती’

    September 8, 2026

    दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?

    September 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif