नीलम गोऱ्हे शिंदे गटात जाणार ?; चर्चांना उधाण

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोर्‍हे (Neelam Gorhe) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची मुंबईतील हॉटेल ट्रायडेंटमध्ये भेट झाली. या भेटीनंतर चर्चांना उधाण आलं आहे. तसेच नीलम गोऱ्हे मागच्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर त्यांची आणि मुख्यमंत्री शिंदें यांच्यात झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

मुख्यमंत्री शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांची भेट झाली तेव्हा भाजप नेते आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही (Lok Sabha Speaker Om Birla) तिथे उपस्थित होते. ओम बिर्ला मुंबई आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी खासदार गजानन कीर्तिकर (MP Gajanan Kirtikar), खासदार राहुल शेवाळेही (MP Rahul Shewale) तिथे उपस्थित होते.

ओम बिर्ला मुंबई दौऱ्यावर आहेत. अशावेळी त्यांच्याशी काही बाबींवर चर्चा करायची होती. त्यासाठी मी तिथे गेले होते. तेव्हा मुख्यमंत्रीही तिथे होते. हा निव्वळ योगायोग होता. ही केवळ सदिच्छा भेट होती. यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असं नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.