जळगाव – सध्या कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर असूनही केंद्र सरकारकडून पेट्रोल व डिझेलच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे बुधवारी जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात तीव्र निषेध नोंदवत रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत दर कपात करावी अशी मागणी करण्यात आली.
कच्च्या तेलाच्या किमती सध्या प्रति बॅरल 65.41 डॉलर असून एप्रिल 2021 नंतर ही सर्वात कमी पातळी आहे. रेटिंग एजन्सींनुसार तेल कंपन्या सध्या पेट्रोलवर प्रति लिटर 15-16 रुपये आणि डिझेलवर 6.12 रुपये नफा कमवत आहेत. तरीही गेल्या एका वर्षात दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारवर जनतेचे आर्थिक शोषण केल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष रिंकू चौधरी, माजी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, डॉ. संग्रामसिंह सूर्यवंशी, सुनील माळी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, माजी नगरसेवक राजू मोरे, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, नामदेव वाघ (ओबीसी सेल), डॉ. राहुल उदासी (डॉक्टर सेल), सरचिटणीस रहीम तडवी, आकाश हिवाळे (महानगर उपाध्यक्ष), चेतन पवार, साहिल पटेल, रफीक पटेल, योगेश साळी, संजय चव्हाण, मयूर पाटील, आबिद खान, अरबाज पटेल आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.


