Sunday, November 27, 2022

राष्ट्रवादीचे सर्व विभाग व सेल बरखास्त; पवारांचा मोठा निर्णय

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

राज्यातील सत्ता स्थापनेनंतर राजकीय घडामोडींना (Maharashtra Politics) वेग आला आहे. राज्यात रोज नवीन घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

शरद पवारांनी राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विभाग आणि सेल तातडीने बरखास्त करण्याचा निर्णय शरद पवारांनी का घेतला याचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी प्रफुल पटेल (NCP General Secretary Praful Patel) यांनी याबाबत एक पत्रक जारी केलं आहे. तर राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल शरद पवारांच्या मंजूरीने बरखास्त करण्यात आले आहेत.

फक्त राष्ट्रीय पातळीवरील सर्व सेल आणि विभाग बरखास्त करण्यात आले आहेत. तर राज्यातील सेल आणि विभागांबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

शरद पवारांच्या या निर्णयानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक सेल व विभागांवर नव्या नियुक्त्या केल्या जातील. मात्र, कोणत्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला यावर आता तर्क-वितर्क लावले जात आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या