Friday, September 30, 2022

नवाब मलिक यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

गुंड दाऊदशी आर्थिक व्यवहार असल्याच्या आरोपाखाली ईडीच्या कोठडीत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात आणले होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर नवाब मलिक यांना अर्धा तासात पुन्हा ईडीच्या कार्यालयात नेणे, अपेक्षित होते. मात्र, तीन ते चार तास उलटूनही नवाब मलिक यांना जे.जे. रुग्णालयातून बाहेर नेण्यात आलेले नाही. याची अधिक चौकशी केली असता नवाब मलिक यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांचा ईपीआरही जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. परंतु, नवाब मलिक यांना नेमका कसला त्रास होत आहे, हे कळू शकलेले नाही. न्यायालयाने यापूर्वीच नवाब मलिक यांना ईडी कोठडीत घरचे जेवण आणि औषधे उपलब्ध करुन देण्यास परवानगी दिली होती.

दरम्यान, नवाब मलिक हे तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवाब मलिक हे चौकशीदरम्यान धमकावण्याचा प्रयत्न करतात. तसेच ते प्रश्नांची उत्तर देण्यात टाळाटाळ करतात, अशी ईडी अधिकाऱ्यांची तक्रार असल्याचे समजते.

पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना ८ दिवसांची कोठडी सुनावली होती. त्यामुळे ३ मार्चपर्यंत नवाब मलिक हे ईडीच्या ताब्यात असतील. दाऊद कनेक्शनप्रकरणी सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, नवाब मलिक हे चौकशीदरम्यान सहकार्य करत नसल्याचा माहिती देखील मिळाली आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या