मलिकांच्या अडचणीत वाढ; दोन मुलांना व पत्नीला ED कडून समन्स

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

नवाब मालिकांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाल्याचे दिसत आहे. मलिकांच्या पत्नीला व दोन मुलांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्यांनी उपस्थित राहण्यास टाळाटाळ केली असल्याचे ई़डीने सांगितले आहे. त्यामुळं त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहेत.

नवाब मलिक यांच्या पत्नी आणि दोन मुलांना चौकशीसाठी ईडीकडून समन्स जारी करण्यात आले होते. परंतु त्यांच्या परिवाराकडून मनमानी करण्यात येत असल्याचं ईडीनं म्हटलं आहे. मलिकांची पत्नी मेहजबीन यांना दोनवेळा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. तर मुलगा फराज मलिक यांना ५ वेळा समन्स बजावण्यात आले होते.

अतिरेकी तसेच कुख्यात गुंड दाऊदशी इब्राहिमशी आर्थिक संबंध असल्याच्या आरोपावरुन व त्या आर्थिक संबंधातून मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे सध्या तुरुंगात आहेत. दरम्यान, नवाब मलिक यांचे कुख्यात गुंड दाऊदशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. ईडीने मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टासमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्रात ईडीने मलिकांचे डी गँगशी संबंध असल्याची माहिती तपशीलवार दिली आहे. तसेच कुर्ल्यातील गोवावाला बिल्डिंग कंपाऊंड १९९६ मध्ये हडपण्याचा कट रचला होता अशी माहिती ईडीने दिली आहे. त्यामुळं मलिकांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा आरोपी दाऊद इब्राहिमचा भाचा अली शाह पारकर याच्या जबाबामुळे अनेक पुरावे हाती आले आहेत. तसेच शाह पारकरची आई हसिना पारकर हिने कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंडचा काही भाग १९९६ मध्ये मलिकांना विकला होता. आपल्या निवेदनात पारकर यांनी जमिनीच्या खरेदी-विक्रीचे अनेक तपशील दिले आहेत, हा तपशील या केससाठी महत्त्वाचा मानला जात असून, हा खटला चालवण्यासाठी शाह पारकर याचा जबाब तसेच खरेदी विक्रेचे तपशील हे आणखी काही गोष्टी उलगडण्यासाठी कामी येतील असं इडीचं म्हणणं आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here