Sunday, November 27, 2022

नवरात्रोत्सवासाठी आज रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वाजवण्यास सुट…

- Advertisement -

 

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

- Advertisement -

आज जिल्ह्यातील नवरात्रोत्सवाला अजून जोश आणि जल्लोषाला उधान आल्याशिवाय राहणार नाही. त्याचे कारण असे की, जिल्ह्यात नवरात्रोत्सवासाठी शनिवारी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वाजवण्यास सूट जाहीर करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आदेश दिले आहेत.

वर्षात एकूण १५ दिवसांपैकी उर्वरित २ दिवसांपैकी नवरात्रोत्सवासाठी ही सूट देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबतचे शासनाचे निर्देश व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशात नमूद करण्यात आलेल्या अटी व शर्ती यावेळी लागू राहणार आहेत. सभागृहे, तसेच सामूहिक सभागृहे व मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी ही सूट जाहीर करण्यात आलेली आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या