ठाकरेंची मोदींवर बोलायची लायकी नाही !

तुमचे हिंदुत्व जनतेने बघितले : नवनीत राणांची टीका 

0

अमरावती, लोकशाही न्युज नेटवर्क

 

बांगलादेशमध्ये अन्याय झाला, त्या मोर्चांमध्ये ठाकरे कुठे होते? आमच्यावर कारवाई केली तेव्हा हिंदुत्व कुठे होते? आम्ही हनुमान चालीसा म्हटले म्हणून आम्हाला जेलमध्ये टाकले. उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. हिंदुत्व हे सत्तेसाठी खुंटीवर टांगणारे तुम्ही, ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलायची लायकी नाही. उद्धव ठाकरे हे टोमणा देणारे जनाब आहेत, असे म्हणत भाजप नेत्या नवनीत राणा यांनी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरे तुमचे हिंदू प्रेम किती बेगडी होते हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेने बघितले. पालघरमध्ये झालेले साधूंचे हत्याकांड आणि तुमची हिंदूविरोधी भूमिका महाराष्ट्राने बघितले आहे. बांगलादेशमधील हिंदूच्या पाठीशी भाजप उभी आहे. त्याचसाठी केंद्र सरकारने ‘नागरिकत्व दुरूस्ती विधेयक’ मंजूर केले. त्यावेळी तुम्ही मात्र काँग्रेसला घाबरून राज्यसभेत बोटचेपी भूमिका घेतली होती, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीटवरुन (एक्स) उद्धव ठाकरेंना धारेवर धरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.