Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    ताज्या बातम्या

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 16, 2026No Comments156 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रिटेल व होलसेल मेडिकल दुकाने सहभागी होणार : सुनील भंगाळे

    जळगाव – ऑनलाइन औषध विक्री आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या धोरणांविरोधात बुधवार दि. 20 मे 2026 रोजी भारतासह महाराष्ट्रात देशव्यापी केमिस्ट संपाची हाक देण्यात आली आहे.ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांच्या नेतृत्वाखाली हा देशव्यापी संप पुकारण्यात आला असून देशभरातील सुमारे 12.4 लाख औषध विक्रेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील सर्व मेडिकल दुकानदारांनीही संपात सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे.
    जळगाव जिल्ह्यातील सर्व रिटेल तसेच होलसेल मेडिकल दुकाने या संपात सहभागी होणार असल्याची माहिती जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी दिली.
    ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांच्या नेतृत्वाखाली हा देशव्यापी संप पुकारण्यात आला असून देशभरातील सुमारे 12.4 लाख औषध विक्रेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील सर्व मेडिकल दुकानदारांनीही संपात सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. सुनील भंगाळे यांनी सांगितले की, अनेक ई-फार्मसी कंपन्या योग्य तपासणी न करता औषध विक्री करत आहेत. डॉक्टरांच्या जुन्या प्रिस्क्रिप्शनचा वारंवार वापर केला जात असून एआयच्या माध्यमातून बनावट प्रिस्क्रिप्शन तयार होण्याचाही धोका वाढत आहे. यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी मोठा खेळ होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. मोठ्या ऑनलाइन कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या मोठ्या सवलतींमुळे पारंपरिक मेडिकल दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचेही सुनील भंगाळे यांनी नमूद केले. ग्रामीण व शहरी भागातील लहान केमिस्ट व्यावसायिक अडचणीत आले असून सरकारने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करताना सुनिलभाऊ भंगाळे म्हणाले की, ऑनलाइन औषध विक्रीमुळे अँटिबायोटिक्सचा चुकीचा वापर, व्यसनाधीन औषधांचा गैरवापर आणि नकली प्रिस्क्रिप्शनद्वारे औषध खरेदीचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे.
    त्यामुळे ऑनलाइन औषध विक्रीवर कठोर नियंत्रण आवश्यक आहे. सरकारने मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही सुनील भंगाळे यांनी दिला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif