harris teeter coupon matchups 8/15 cafe sistina coupon cheryl's cookies free shipping coupon code kellogg's breakfast bars coupons neon colored gifts send me free gift cards
Thursday, December 1, 2022

आणि नाथाभाऊंना तुरुंगात टाका…

- Advertisement -

 

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

- Advertisement -

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री. एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांनी केलेल्या “आता जावयासोबत जेलमध्ये जावे लागेल” या विधानावर जोरदार प्रत्युत्तर देत म्हंटले कि, गिरीश महाजनांमध्ये समोरून सरळ सामना करण्याची ताकद नाही. त्यासाठीच मला वेगवेगळ्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न हा आजचाच नाही, तर पूर्वीपासून ते प्रयत्न सुरू आहे. झोटिंग, अँटी करप्शन विविध माध्यमातून चौकशी झाल्या, परंतु कुठलाही तथ्य समोर आले नाही. असे खडसे म्हणाले.

- Advertisement -

लंडनमध्ये माझ्या जावयाकडे स्वतः गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवस घरी राहून जेवण केले होते. त्यांच्या घरचे मीठ खाल्ले. आणि त्यांना ईडीमध्ये अडकून उपकार केले. काहीतरी शोधा आणि नाथाभाऊंना तुरुंगात टाका, हा एकमेव हेतू यांचा सुरू आहे. अशी टीका एकनाथ खडसे यांनी केलेली आहे. आता ईडी चौकशी करतेय, त्यातही एकाच प्रकरणाच्या वारंवार चौकशा केल्या जात आहेत. माझ्यावरील षडयंत्र राजकीय आकसापोटी, राजकीय सूड सुरू आहे. असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या