शॉर्टसर्कीटमुळे साडे सहा लाखांचा ऊस जळून खाक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

नशिराबाद येथील शेतातील विद्युत तारांच्या शार्टसर्कीटमुळे आगी लागल्याने २ हेक्‍टर मधील सुमारे साडे सहा लाखाचा उस जळून खाक झाल्याची घटना घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मीक आगीची नोंद करण्यात आले आहे.

दीपक अशोक नारखेडे (वय ३३, रा. खालची अळी, नशिराबाद) यांचे नशिराबाद शिवारात शेत गट नंबर १५२/१ मध्ये २ हेक्टर ११ आर शेत आहे. या शेतात त्यांनी उसाची लागवड केलेली आहे. दरम्यान मंगळवार १२ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतातून गेलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत ताऱ्यांमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने शेतातील उसाला लागली.

या आगीमुळे शेतकरी दीपक नारखेडे यांचे ६ लाख ३० हजार रूपयांचा ऊस आणि २० हजार रुपये किमतीचे पाईप असे एकूण साडेसहा लाख रुपये किंमतीचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी दीपक नारखेडे यांनी नशिराबाद येथे दिलेल्या खबरी वरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.