
लोकशाही न्यूज नेटवर्क
नाशिकमधील आयटी कंपनी टीसीएसमध्ये महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शौषण आणि धर्मांतरण केल्याप्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असतानाच आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. टीसीएस प्रकरणातील आरोपीचं दिल्ली स्फोटातील आरोपीसोबत कनेक्शन असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणातील फरार एचआर मॅनेजर निदा खान ही दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची दिशाच बदलली आहे. हे प्रकरण कुणावर शेकणार आणि नाशिकमध्ये अजून काही असे प्रकार सुरू आहेत का? नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर हाती येत असलेली माहिती यंत्रणांचे टेन्शन वाढवणारी आहे.
टीसीएस नाशिक प्रकरणातील एचआर मॅनेजर निदा खान फरार आहे. ती सध्या भिवंडीत लपल्याची माहिती सूत्रांनी दिली. निदा खानचा दिल्ली ब्लास्टमधील डॉक्टर शहीनशी लिंक असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. या कनेक्शनमुळे तपासाला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने जोडून पाहण्यात येत आहे. पोलिसांकडून विविध ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे. संशयास्पद माहिती तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात कळवण्याचं आवाहन करण्यात आले आहे. टीसीएस प्रकरणात लैंगिक अत्याचार, धर्मांतराचे आरोप करण्यात आले आहेत. तपास यंत्रणांकडून सर्व बाजूंनी सखोल चौकशी सुरू आहे. पुढील काही दिवसांत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
नाशिक येथील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणाचा तपास आता दहशतवाद तपास पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला आहे. नाशिक शहरात एटीएसचे पथक दाखल, एक अधिकारी आणि तीन कर्मचारी यांनी तपास सुरू केला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये होणाऱ्या प्रकाराची केंद्रीय तपास यंत्रणांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. नाशिक शहर पोलीसांकडून याबाबतची माहिती तक्रारदारांकडून घेतली जाणार आहे. स्वत: एटीएस आरोपींची चौकशी करणार आहे. तपासासाठी सी डी आर रिपोर्ट महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जे लोक हिंदूंच्या मुलींचं धर्मांतरण करत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी भाजप नेत्या आणि आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे. हिंदुस्थानमध्ये अशा घटना आम्ही खोवून घेणार नाही. मतांचे राजकारण करणाऱ्यांनी आपले तोंड उघडावे. आरोपींच्या घरांवर बुलडोझर फिरवा, त्यांचे राष्ट्रीयत्व रद्द करा. आरोपींचे वकीलपत्र घेणाऱ्यांनी देखील याचा विचार करावा. आज आम्ही या विरोधात भव्य मोर्चा काढतो आहोत. या आरोपींचे कनेक्शन शोधायला हवे. गृहमंत्रालयाने स्वतः ही प्रकरण शोधून काढून कारवाई केली आहे, असे फरांदे म्हणाल्या.

