Wednesday, August 17, 2022

बसमधून विद्यार्थिनीचा मोबाइल लंपास; बसला दीड तास खोळंबा

लोकशाही न्युज नेटवर्क

नाशिक: येथील जुन्या सीबीएस बस स्थानकातून दुपारी साडेतीन वाजता त्र्यंबकेश्वरकडे निघालेल्या बसमध्ये एका विद्यार्थिनीच्या पाठीवरील बॅगमधून अज्ञात चोरट्याने मोबाइल काढून घेतल्याचा प्रकार मंगळवारी (दि. २२) घडला. यामुळे दुपारची बस संध्याकाळी साडेपाच वाजता त्र्यंबकेश्वरच्या दिशेने सरकारवाडा पोलीस ठाण्यासमोरून सुटली.

जुन्या सीबीएस बस स्थानकातून पेगलवाडी येथे राहणारी एक विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणींसह त्र्यंबकेश्वर बसमध्ये (एमएच १४ – बीटी ०३६७) जोरजोराने रडण्यास सुरुवात केली असता बसवाहकाने तिची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला. बसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बस स्थानकावरील बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस तेथे हजर नव्हते.

ते अर्धा तास उशिराने तेथे दाखल झाले. तोपर्यंत बस तेथेच दुसऱ्या पोलिसांनी थांबवून ठेवली होती. चार वाजेच्या सुमारास बस स्थानकात कर्तव्यावर असलेले पोलीस पोहोचले. पोलिसांच्या सांगण्यावरून ती बस सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ चालकाने आणली.

येथे सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या महिला, पुरुष पोलिसांनी बसमधील प्रत्येक प्रवाशाला खाली उतरवून त्यांच्याकडे असलेल्या सामानाची झडती घेतली. तसेच काही प्रवाशांची अंगझडतीही यावेळी पोलिसांकडून घेण्यात आली; मात्र कोणाकडेही त्या शाळकरी मुलीचा मोबाईल आढळून आला नाही. प्रत्येक प्रवाशाकडे असलेला मोबाइल काढून तिला दाखवून ओळखण्याचाही प्रयत्न यावेळी पोलीस करीत हाेते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या