Wednesday, August 17, 2022

माजी कुलसचिव कापडणीस हत्याप्रकरण; मोबाईलच्या शोधात पोलीस ठाणे जिल्ह्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क 

नाशिक : माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांच्या मोबाइलद्वारे ओटीपीच्या आधारे वेळोवेळी रक्कम काढल्यानंतर मोबाइलचा पुरावा समोर येऊ नये यासाठी संशयित राहुल जगताप याने माेबाईल ठाणे जिल्ह्यातील खाडीत फेकल्याची माहिती समोर आल्याने सरकारवाडा पोलीस ठाण्यातील तपास पथकाने बुधवारी (दि. २३) संशयित राहुलसोबत ठाणे येथील घटनास्थळ गाठले. मात्र पोलिसांना रात्री उशिरापर्यंत मोबाइल मिळाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांची गळा दाबून हत्या केल्यानंतर संशयित राहुल जगताप याने काही दिवस त्यांच्या मोबाइलच्या आधारे ओटीपी मिळवत पैशांचे व्यवहार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. परंतु, त्याने नानासाहेब कापडणीस व अमित यांच्या दुहेरी हत्याकांडातून सुटका करून घेण्यासाठी कोणताही पुरावा समोर येऊ नये म्हणून संबंधित मोबाईलची ठाणे जिल्ह्यातच विल्हेवाट लावल्याची माहिती समोर आली.

तसेच या हत्याकांडानंतर जगतापने मुंबईतील सेलिब्रिटी कारमॉलमधून रेंज रोव्हर खरेदी केल्याचेही समोर आले आहे. या दोन्ही घटनांच्या तपासासाठी बुधवारी पोलिसांचे पथक ठाणे येथे गेले होते. या ठिकाणी पोलिसांच्या हाती मोबाइल लागू शकला नाही. मात्र, पोलिसांनी रेंज रोव्हरच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या