अवैधपडे शेकडो अवैध झाडांची कत्तल; वृक्ष वाहनासह ताब्यात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

नाशिक (इगतपुरी) :  इगतपुरी तालुक्यात अवैध झाडांची कत्तल करणार्‍यासह लाकडांचा व्यवसाय करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. तालुक्यात अवैधपडे शेकडो अवैध झाडांची कत्तल करून वाहतूक सुरू असल्याची माहिती इगतपुरी वनविभागाच्या अधिकार्‍यांना शुक्रवारी मिळाली होती. त्या आधारे वनपरिक्षेत्र हद्दीतील वासाळी फाटा येथे ट्रक (क्र. एमएच 12 एचडी 7856) हा सिन्नरच्या दिशेने जात असताना या ट्रकला अडविण्यात आले.

चालकाकडे परवान्याची मागणी केली. मात्र, परवाना नसल्याने वनविभागाचा संशय खरा ठरला. वनविभागाने ट्रक उघडून पाहिला असता, त्यात आंबा, जांभूळ, सादडा या जातीचे अवैधरीत्या तोडलेले वृक्ष भरलेले आढळून आले.

या ट्रकमध्ये अंदाजे 26 टन तोडलेल्या वृक्षाचे लाकूड असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. या ट्रकला चालकासह ताब्यात घेतले. हे वाहन पुढील कारवाईसाठी वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारात आणून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी दत्तू ढोन्नर, भाऊसाहेब राव, वनरक्षक स्वाती लोखंडे, गोरख बागूल, वाहनचालक शेख, वनमजूर निरगुडे, कोरडे, धोंगडे आदींसह वनकर्मचारीचे पथक यांनी कारवाई पूर्ण केली.

पुढील तपास सुरू असून या कारवाईने इगतपुरी तालुक्यात अवैध झाडांची कत्तल करणार्‍यासह लाकडांचा व्यवसाय करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत तालुक्यात किती लाकूडतोडे सक्रिय आहेत, याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी बिरारीस अधिक माहिती घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.