चोरट्यांची नजर खाद्यतेलावर.. चक्क बाजारसमितीतून खाद्यतेलाची चोरी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

नाशिक 

पंचवटी :आता दिवसेंदिवस महागाईचे प्रमाण वाढत आहे तसेच, किराणा माल, खाद्यतेल महाग झाल्याने, काही चोरट्यांनी आता किराणा मालाचे दुकानाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. एका दुकानातून चोरट्यांनी खाद्यतेल चोरी सुरू केल्याची घटना घडली.

पेठ रोडवरील शरदचंद्र पवार बाजार समितीत असलेल्या किराणा दुकानाच्या बाथरूमच्या लोखंडी गज कापून दुकानात प्रवेश करून, लाखो रुपये किमतीचे खाद्यतेल डबे, तेल पिशव्या चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.

हिरावाडी रोड ओमनगरीत राहणाऱ्या महेश गोविंद ठक्कर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुरुवारी (दि. १०) रात्री ते शुक्रवारच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ठक्कर यांचे बाजार समितीतील श्रीराम ट्रेडर्स नावाच्या होलसेल किराणा दुकानाच्या बाथरूमच्या गज कापल्या.

दुकानात प्रवेश करून खाद्य तेलाचे डबे, पिशवीतील पॅकिंग तेल बॉक्स असे जवळपास १ लाख ७ हजार रुपयांचे खाद्यतेल चोरी केले आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.