Video: हृदयद्रावक.. राष्ट्रगीत सुरू असतानाच माजी सैनिकाचा मृत्यू

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नाशिकमधून हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये ‘आझादीका अमृत महोत्सव’ कार्यक्रमात एका माजी सैनिकाचा कार्यक्रम चालू असताना अचानक मृत्यू (ex serviceman died) झाला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये राष्ट्रगीत म्हणत असताना अचानक माजी सैनिक खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू  झाला.

 

नाशिकमधील संदीपगर येथील शाळेत सोमवारी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आझादीका अमृतमहोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी सैनिक चंद्रभान मालुंजकर यांना यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. चंद्रभान मालुंजकर 1962 च्या युद्धात सहभागी झाले होते.

या कार्यक्रमादरम्यान शाळेच्या परिसरात सकाळी 9 वाजता प्रभातफेरी काढण्यात आली होती. यानंतर राष्ट्रगीत सुरू असताना अचानक ते खाली कोसळले. यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा अगोदरच मृत्यू झाला होता. मालुंजकर यांनी निवृत्तीनंतर सातपूर परिसरात माजी सैनिक संघटनांच्या माध्यमातून नव तरुणांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या माघारी त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.