संतापजनक; नाशिक रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, जिवंत रुग्णास केले मृत घोषित

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

स्वतःला जाळून घेतलेल्या व्यक्तीला जिवंतपणीच मृत घोषित केल्याचा संपतापजनक प्रकार गुरुवारी सकाळी नाशिकच्या (Nashik) जिल्हा रुग्णालयात (District Hospital) घडला आहे. या संतापजनक प्रकारानंतर रुग्णयांच्या नातेवाइकांनी डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले आहे. या गंभीर प्रकरणाची रुग्णालयातील वरिष्ठ स्थरावरून माहिती घेतली जात आहे.

सांगितलेल्या माहितीनुसार नितीन सुरेश मोरे यांनी २२ तारखेला दुपारी स्वतःला दुकानात पेट्रोल टाकून पेटवून घेतले होते. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले होते. ते ९३ टक्के भाजले असून, गुरुवारी सकाळी ६.३० च्या सुमारास त्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. प्रशिक्षणार्थी डॉ. नलवाडे यांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर इसीजी घेतला. इसीजीचा रिपोर्ट फ्लॅट (सरळ रेष) आल्याने त्यांनी मोरे मयत झाल्याचे सांगितले. त्यावेळी मोरे यांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. नातेवाईकांनीही रुग्णालयीन व पाेलिस प्रक्रियेनुसार सिव्हिल पोलीस चौकीत रुग्ण मयत झाल्याची माहिती दिली.

परंतु सकाळी आठ वाजेच्या सुमारास वॉर्डमध्ये उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यास मयत मोरे यांच्या पायांची मंद हालचाल होत असल्याचे दिसले. त्यांनी इसीजी रिपोर्ट घेतला असता रुग्णाच्या हृदयाचे ठोके सुरु हाेते. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय उपचार सुरू केले. मयत मोरे जिवंत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आल्यानंतर मात्र त्यांचा संताप अनावर झाला. या धक्कादायक प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.