नेझल लसीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

आता पुन्हा देशावर कोरोनाचं संकट येत आहे. चीनमधील (China) वाढत्या कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता भारतासह अनेक देश सतर्क झाले आहेत. यामुळे केंद्र सरकार (Central Govt) आणि राज्य सरकारकडून (State Govt) पुन्हा एकदा नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच गेल्या आठवड्यात भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) नाकावाटे (Nasal Vaccine) दिल्या जाणाऱ्या लसीला मंजुरी मिळाली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, नाकावाटे देण्यात येणाऱ्या iNCOVACC लसीची किंमत खासगी रूग्णालयांमध्ये 800 + 5% GST म्हणजेच 1000 मोजावे लागतील तर, सरकारी रूग्णालयांमध्ये यासाठी 325 रुपये मोजावे लागणार आहेत.

कधी उपलब्ध होणार लस?
कोवॅक्सिन किंवा कोविशील्डने पूर्णपणे लसीकरण केलेल्या नागरिकांसाठी इंट्रानेझल लसीला यापूर्वी बूस्टर शॉट म्हणून मंजुरी देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जानेवारीच्या अखेरीस ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत त्यांच्यासाठी ही लस जानेवारी महिन्यापासून उपलब्ध होईल असे सांगितले जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.