सुनेची मागणी वडिलांनी नाकारली; मग मुलाने आणि सुनेने केलं…

0

 

नंदूरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

घरात लहान मोठे वाद होणे नेहमीचे असते. काही ठिकाणी वाद हे हसत खेळत किंवा सुसंवादातून मिटवले जातात, तर काही ठिकाणी ते इतके विकोपाला जातात कि त्यामुळे अख्ख्या कुटुंबाची राखरांगोळी होते. अशीच एक धक्कादायक घटना नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात घडली आहे. कौटुंबिक वादातून नवापूर शहरातील तीनटेंभा भागातील रहिवासी असलेले सावंत सय्यद गावित त्यांच्या पत्नी रोशनी सावंत गावित आणि वडील सय्यद कर्मा गावित या तिघांनी रात्रीच्या सुमारास फुलफळी भागात असलेल्या रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने नवापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सावंत सय्यद गावित यांनी वडिलांकडे नवीन मोटरसायकलची मागणी केली. मात्र वडिलांनी ती घेऊन दिली नाही. या विषयावरून रागाच्या भरात सावंत गावित आणि त्यांची पत्नी रोशनी गावित यांनी फुलफळी भागातील रेल्वे रुळावर आत्महत्या केली. हे सर्व पाहून वडील सय्यद गावित यांनीही रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या करत आपला जीव दिला.

या घटनेने नवापूर शहर हादरले असून घटनेची माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना कळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ, जमादार युवराज परदेशी, विकी वाघ यांना घटनास्थळी तपास करत घटनेचा पंचनामा करून तिघही मृतदेह नवापूर उपजिल्हा रुग्णालय पाठविले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.