नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क

नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर असलेल्या कुंभारवाडा फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ॲपेरिक्षाने एका पादचाऱ्याला मागून जोरदार धडक दिली. यात एका ५८ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नंदुरबार-विसरवाडी रस्त्यावर वैयक्तिक कामासाठी रस्त्याने जात असलेल्या विक्रम गावित या ५८ वर्षीय व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला. रस्त्याने बेशिस्त पद्धतीने भरधाव वेगाने जाणाऱ्या ऑटो रिक्षा चालकाने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत संबंधित व्यक्तीच्या डोक्याला आणि चेहऱ्याला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या. त्यामुळे या व्यक्तीची जागीच मृत्यू झाला आहे.
रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल
या घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले झाले. अपघातात मृत झालेल्या व्यक्तीस विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, घटनेची माहिती मिळतात मृत व्यक्तीचा नातेवाईकांनी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. धडक देणाऱ्या ॲपेरिक्षा चालकाविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

