Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»नंदकिशोर महाजनांना मिळाली पक्षनिष्ठेची पावती!
    राजकारण

    नंदकिशोर महाजनांना मिळाली पक्षनिष्ठेची पावती!

    दिग्गजांना धक्का : केंद्रीय नेतृत्वानेच केले शिक्कामोर्तब
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 1, 2026Updated:June 1, 2026No Comments401 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    दीपक कुलकर्णी

    जळगाव

    विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाकडून सुरुवातीला अनेक नावे पुढे आली मात्र पक्षश्रेष्ठींनी धक्कातंत्र अवलंबित श्री. महाजन यांनी उमेदवारी बहाल केली आहे. तब्बल 20 वर्षांच्या पक्षनिष्ठेची पावती म्हणून पक्षाने ही उमेदवारी दिल्याची भावना आहे. सारख्या माणसावर विश्वास दर्शवित भाजपाने एका दगडात अनेक पक्षी मारले आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहिले की पक्ष दखल घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही संधी देत न्याय देतो हे यावरून स्पष्ट आहे.

    विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत जळगावचे नंदकिशोर महाजन यांचे नाव समोर येताच राजकीय वर्तुळात आश्चर्य आणि चर्चांना उधाण आलेे. उमेदवारीसाठी अनेक प्रस्थापित आणि प्रभावशाली नेत्यांची नावे चर्चेत असताना पक्षश्रेष्ठींनी शेवटच्या क्षणी धक्कातंत्राचा वापर करत महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या निर्णयाकडे केवळ राजकीय नियुक्ती म्हणून नव्हे, तर तब्बल दोन दशकांच्या पक्षनिष्ठेची आणि संघटनात्मक कार्याची मिळालेली पावती म्हणून पाहिले जात आहे. भाजपमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम करताना नंदकिशोर महाजन यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडणे, निवडणुकांमध्ये संघटनात्मक कामाला प्राधान्य देणे आणि पक्षाच्या धोरणांशी एकनिष्ठ राहणे, ही त्यांची ओळख राहिली आहे. त्यामुळे उमेदवारीची घोषणा होताच कार्यकर्त्यांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

    विशेष म्हणजे, विधान परिषदेसाठी इच्छुकांची संख्या मोठी होती. अनेक अनुभवी आणि वजनदार नेत्यांची नावे चर्चेत असताना महाजन यांची निवड झाल्याने भाजपने पुन्हा एकदा पक्षासाठी काम करणाऱ्यांची दखल घेतली जाते हा संदेश दिल्याचे मानले जात आहे. पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या या निर्णयातून संघटनात्मक कामाला आणि निष्ठेला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपने या निर्णयातून एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला आहे, तर दुसरीकडे पदासाठी स्पर्धा करणाऱ्या इच्छुकांना पक्षनिष्ठा आणि संयम यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. पक्षाशी दीर्घकाळ प्रामाणिक राहिल्यास योग्य वेळी संधी मिळू शकते, हा संदेश या उमेदवारीतून राज्यभरातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे. जिल्ह्यातही या निर्णयाचे सकारात्मक पडसाद उमटत आहेत. महाजन यांच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे बोलले जात आहे. अनेक कार्यकर्त्यांनी हा निर्णय संघटनात्मक कार्याला मिळालेला सन्मान असल्याची भावना व्यक्त केली आहे.

    भाजपची कार्यपद्धती आणि उमेदवार निवडीचा निकष याबाबत अनेकदा चर्चा होत असते. मात्र नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीने पक्षाने पुन्हा एकदा कार्यकर्ता केंद्रस्थानी असल्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे ही उमेदवारी केवळ एका व्यक्तीची राजकीय बढती नसून, दीर्घकाळ पक्षासाठी झटणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांच्या आशा-अपेक्षांना बळ देणारी ठरली आहे.

    कोण आहे महाजन?

    नाव : नंदकिशोर महाजन
    पत्ता : मु. पो. तांदलवाडी ता रावेर जि. जळगाव
    जन्म तारीख : 01/06/1976
    पक्ष : भारतीय जनता पार्टी
    शिक्षण : बी.ए.
    व्यवसाय : शेती
    मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून जिल्ह्यात ओळख

    भुषवलेली पदे

    * मार्च 2007 ते मार्च 2012 पं.स. सदस्य, रावेर
    * 2009 ते 2012 सभापती पं.स. रावेर
    * 2012 ते 2017 पं. स. सदस्य, रावेर
    * 2015 जिल्हा मध्यवर्ती सह. बँक. लि. संचालक
    * 2015 मधुकर सहकारी साखर कारखाना संचालक
    * 2017 ते 2021 जि.प. सदस्य जळगाव
    * 2017 ते 2019 जि.प. उपाध्यक्ष तथा कृषी व पशु संवर्धन सभापती

    पक्षीय जबाबदारी

    * सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीची रावेर लोकसभा संयोजन जबाबदारी
    * भा.ज.पा. जिल्हा उपाध्यक्ष, जळगांव म्हणून जबाबदारी
    * लोकसभा 2024 साठी भा.ज.पा. रावेर लोकसभा निवडणुक प्रमुख म्हणून जबाबदारी
    * जळगांव पुर्व भा.ज.पा. जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026

    अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडले

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif