नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून महा-ई-सेवा केंद्र चालक आपल्या माध्यमातून गोरगरीब जनतेला राज्य शासनाचे तसेच केंद्र शासनाचे विविध सुविधा देत असतात. तसेच शासनातर्फे आलेल्या शासकीय योजना व विद्यार्थ्यांसाठी लागणारे शैक्षणिक कागदपत्र हे सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचे महत्त्वाचे भूमिका निभावतात. पण गेल्या अनेक वर्षापासून महा-ई-सेवा केंद्र चालकांना विविध समस्या व अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये त्यांना योग्य तो कमिशन मिळत नाही शासनातर्फे आलेले सहकार्य मिळत नाही अशी त्यांची भावना आहे.
या निवेदनाच्या माध्यमातून केंद्र चालकांना मृत्यू झाल्यास सेतू केंद्र हे वारसाच्या नावाने हस्तांतरित करण्यात यावे, तसेच प्रति दाखला मागे शंभर रुपयाचे कमिशन देण्यात यावे, महा-ई-सेवा केंद्र संचालक व त्याच्या कुटुंबाला आरोग्य विमा शासनातर्फे काढून देण्यात यावा, नियम बाह्य दिलेले सेतू केंद्राचे परवाने रद्द करण्यात यावेत, आधारचे कमी कमिशन वेळेवर मिळावे आणि तसेच या आधार केंद्र चालकाचे किट विना कारण बंद केलेले आहेत त्यांचे कीट त्वरित चालू करून द्यावेत. अशा विविध मागण्यासाठी आज नांदेड महा सेवा केंद्र चालक संघटन व आधार संघटन तर्फे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी अखिलस्तरीय महा ई सेवा व आधार केंद्र संघटन महाराष्ट्र राज्य जिल्हा नांदेड तर्फे जिल्हाधिकारी यांना संघटनेच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी नांदेडचे जिल्हाध्यक्ष शेख नदीम, महाराष्ट्र प्रतिनिधी ॲड.तुळशिराम पा.चितळकर, सचिव नागनाथ स्वामी, राजेश रगटे, दत्तप्रसाद आसोरे, बालाजी हूगे, गणेश मॅकल, उदयसिंह चव्हाण, भागवत गादेवार, शिवराज पा.जाधव, भुजंग कारामुंगे यासह आदी जण उपस्थित होते.