डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य संकलन…

0

 

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे धरणगाव येथे गणपती विसर्जनानिमित्त बैठकीतील सदस्यांमार्फत निर्माल्य संकलन करण्यात आले. त्यात एकूण 1 टन संकलन झाले, निर्माल्य संकलनासाठी धरणगाव, पिंपरी खुर्द, पाळधी, बिलखेडा व सोनवद येथील एकूण 162 श्री सदस्यांनी सहभाग नोंदविला. दरवर्षी प्रमाणे निर्माल्य संकलन सकाळी 10 वाजेपासून ते रात्री 11 वाजून 30 मिनिटांपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावून करण्यात आले.

याप्रसंगी सकाळी उद्घाटनाप्रसंगी धरणगाव शहराचे पोलीस निरीक्षक राहुल खताड, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार, शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, गटनेता कैलास माळी, नगरसेवक राजेंद्र महाजन, नगरसेवक विजय महाजन, सामाजिक कार्यकर्ते सुनील चौधरी, भानुदास विसावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव, वाल्मीक पाटील, भैय्या महाजन आदी. मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.