तरुणीच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडनं लिहायला लावलं नाव; एकाला अटक

0

 

लखनौ, लोकशाही न्यूज नेटवर्क:

उत्तर प्रदेशमधील लखनौ (Lucknow) येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 25 वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थ्याला एका तरुणीला धमकावल्याच्या प्रकरणावरून अटक करण्यात आली आहे.

21 वर्षीय पीडितेच्या पालकांनी आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. एफआयआरनुसार, पीडिता आणि आरोपी लखनौमधील एका खासगी संस्थेत नर्सिंगचा कोर्स करत आहेत. दोघेही मॉल परिसरात असलेल्या सीएचसीमध्ये इंटर्नशिप करत आहेत. या मुलानं पीडित मुलीला तिच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडनं त्याचं नाव लिहिण्यास भाग पाडलं होतं आणि नंतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही केला होता.

पश्चिम विभागाचे एडीसीपी चिरंजीव नाथ सिन्हा यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, आरोपी अवेंद्र सोनावली यानं पीडित मुलीशी मैत्री केली आणि आपला हेतू साध्य करण्यासाठी तिचा मोबाईल नंबर मिळवला. त्याने मुलीशी व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे बोलण्यास सुरुवात केली. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, अशी बतावणी त्यानं केली. पण, मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर तो मुलगी राहत असलेल्या ठिकाणीही गेला आणि चाकूचा धाक दाखवून तिचा अश्‍लील व्हिडिओ बनवला. माझ्याशी लग्न कर नाहीतर परिणामांना सामोरी जा, अशी धमकीही त्यानं तिला दिली होती.

आरोपीनं पुन्हा पीडित मुलीला व्हिडिओ कॉल करून,  लग्न केलं नाही तर तिला आणि तिच्या पालकांना मारून टाकेल, अशी धमकी दिली. त्याने मुलीला व्हिडिओ कॉलवर तिचं रक्त दाखवण्याचीही मागणी केली. तिच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडनं त्याचं नाव लिहिण्यास भाग पाडलं. नंतर त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. मुलीच्या पालकांपर्यंत ही बातमी पोहोचल्यानंतर त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली.

सोमवारी 21 नोव्हेंबर रोजी पीडित मुलीनं पोलीस आणि न्यायदंडाधिकार्‍यांसमोर आपला जबाब नोंदवला. त्याआधारे आम्ही आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती एडीसीपी सिन्हा (ADCP Sinha) यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.