मेडिटेशनमुळे तणाव, नैराश्य दूर होते – समृद्धी रडे

0

लोकशाही न्युज नेटवर्क

गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च व डॉ वर्षा पाटील वूमेन्स कॉलेज ऑफ कंप्युटर अप्लिकेशन महाविद्यालयात प्रा. समृद्धी रडे यांचा मेडिटेशन अ‍ॅण्ड लॉ ऑफ अट्रॅक्शन या विषयावर एक दिवसीय सेमिनार आयोजित केला होता.

कार्यक्रमाचे सुरुवातीस महाविद्यालयाचे प्रा.आफ्रिन खान यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिले. यावेळी समृद्धी रडे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला व मेडिटेशन बद्दल माहिती देताना सांगितले की मेडिटेशन नियमित केल्यास शरीराला भरपूर फायदा होतो. विद्यार्थी जीवन खूप महत्त्वाचे आहे आणि यामध्ये नकारात्मक विचारांनी नुकसान होते. मेडिटेशन केल्याने नकारात्मक विचार, तणाव दूर करण्यास मदत होते, मानसिक शक्तीचा विकास होतो, स्मरणशक्ती व सकारात्मकता वाढते. मेडिटेशन केल्याने आपली एकाग्रता वाढण्यास मदत होते. सदर सेमिनारला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सेमिनारचे कामकाज प्रा. आफ्रिन खान यांनी पाहिले.यावेळी महाविद्यालयाच्या डॉ. नीलिमा वारके यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.