collegebooksdirect coupon 4 year wedding anniversary gift ideas for husband cohen's fashion optical coupon chobani coupons usa engagement gift ideas for the couple from parents
Friday, December 2, 2022

रवींद्र जडेजा मोठ्या पेचात ! प्रचार कुणाचा करणार?

- Advertisement -

अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे (Gujarat Assembly Elections) जोरदार वारे वाहत आहेत. या निवडणुकीत क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची (Cricketer Ravindra Jadeja) अवस्था बिकट झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण जडेजाची पत्नी रीवाबा जडेजा (Rewaba Jadeja) रिंगणात उतरली आहे. तर रीवाबा यांच्यासमोर त्यांची नणंद नैना जडेजाचे (Naina Jadeja) आव्हान आहे. त्या काँग्रेसच्या (Congress) स्टार प्रचारक आहेत.

- Advertisement -

नैना जडेजा या गुजरात महिला काँग्रेसच्या महामंत्री आहेत. जिथे रीवाबा जडेजा भाजपच्या (BJP) उमेदवार आहेत. तिथेच नैना जडेजा काँग्रेस उमेदवारासाठी दिवसरात्र प्रचार करताहेत. यामुळे रवींद्र जडेजा धर्मसंकटात सापडला आहे.

- Advertisement -

 प्रचार कुणाचा ?
रवींद्र जडेजा सध्या बायकोचा प्रचार करायचा की बहिणीचा या पेचात आहे. मात्र, आतापर्यंत तरी त्याने बायकोच्या उमेदवारीला प्राधान्य देत तिला प्रचारात मदत केली आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या