स्कुल व्हॅन नाल्यात पडली; 16 विद्यार्थी बचावले, 2 जखमी

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नागपूरमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन स्टेरिंग लॉक (School Van)  होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात असलेल्या पाण्यात पलटली. नागपूरच्या मानेवाडा – बेसा रोड वर घोगली परिसरात एका स्कूल व्हॅनचा अपघात झाला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामध्ये ही व्हॅन पलटली आहे. यावेळी गाडीमध्ये 15 ते 16 विद्यार्थी होते. या अपघातात 2 विद्यार्थी जखमी झाले आहेत.

मोठ्या खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामध्ये ही व्हॅन उलटली आणि व्हॅनमध्ये बसलेले 15 ते 16 विद्यार्थी ही पाण्यामध्ये पडले. परिसरातील तरुणांनी लगेच धाव घेत विद्यार्थ्यांना पाण्यातून बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मात्र पाण्यात पडल्यामुळे दोन विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. व्हॅनची गती जास्त होती आणि रस्त्यावर चिखल आणि खड्डे असल्यामुळे ही व्हॅन रस्त्याशेजारी मोठ्या खड्ड्यात भरलेल्या पाण्यात घुसल्याची माहिती आहे. रोहन उच्च प्राथमिक विद्यालयाची ही व्हॅन होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here