बापरे…भंगारवाल्याकडे सापडले तब्बल शंभरावर आधारकार्ड

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

नागपूर :येथील भंगारवाल्याने आधारकार्डच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला त्याची ओळख मिळाली आहे. अत्यंत महत्त्वाचे असलेले हे दस्तावेज मेकोसाबाग येथे एका भंगारवाल्याकडे मोठ्या संख्येने आढळले आहे. हा भंगारवाला या आधारकार्डची विक्री २० रुपयांना करीत आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर आधारकार्ड बनविणाऱ्या आणि ती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणाऱ्या या संपूर्ण यंत्रणेतील निष्काळजीपणा उघडकीस झाली आहे.

जरीपटका भागातील मेकोसाबाग ख्रिश्चन कॉलनीत राहणाऱ्या एका भंगारवाल्याकडे किमान १५० च्या जवळपास आधारकार्ड आहे. या आधारकार्डवर असलेल्या नंबरवर तो लोकांना फोन करून प्रतिकार्ड २० रुपयांची मागणी करीत होता. ही बाब प्रभात अग्रवाल यांना समजल्यानंतर त्यांनी याबाबत चौकशी केली असता, हे आधारकार्ड भंगार व्यावसायिकाला कचरा वेचणाऱ्यांकडून मिळाल्याचे त्याने सांगितले.

यातील बहुतांश आधारकार्ड हे उत्तर नागपुरातील नागरिकांचे होते. भंगारवाला आधारवरील लोकांना संपर्क करून २० रुपयाला विकत होता. इतके महत्त्वाचे दस्तावेज भंगारात मिळण्याचा हा प्रकार अतिशय धोकादायक आहे.

– पोस्टमनवर संशय

आधारकार्डसाठी नोंदणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीची माहिती यूएडीएआयच्या पोर्टलवर जाते आणि डाक विभागाच्या माध्यमातून आधारकार्ड घरापर्यंत पोहोचते. या प्रकरणात ज्या पोस्टमनकडे हे आधारकार्ड संबंधित व्यक्तीच्या पत्त्यावर पोहोचविण्याची जबाबदारी होती. त्यांनी ते लोकांपर्यंत न पोहोचविता कचऱ्यात टाकले असतील, असाही संशय व्यक्त केला जातो.

– इतके महत्त्वाचे असलेले दस्तावेज भंगारात सापडत असतील, तर या प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने चौकशी करणे गरजेचे आहे. यात जो कुणी दोषी असेल, त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here