नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सुधाकर अडबाले यांचा विजय

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने पाठिंबा दर्शवलेल्या ना.गो.गाणार यांचा पराभव झाला आहे, तर काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे. नागपूर भाजपाचा बालेकिल्ला असून, विद्यमान उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री नागपूरचे असतानाही काँग्रेसच्या उमेदवारास पहिल्या पसंतीची तब्बल ५५ टक्के मतं मिळाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.
नागपूर शिक्षक मतदारसंघात 22 उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत भाजपचे नागो गाणार आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्यात झाली.
अडबाले यांना 16500 मते मिळाली, तर गाणार यांना 6366 मतांवर समाधान मानावे लागले. पहिल्या फेरीत अडबाले यांना 14071 मते मिळाली. तर गाणार 6309 मतांवर राहिले. अडबाले यांनी पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करून विजय मिळवला.

भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय असणाऱ्या नागपूरमध्ये झालेला पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. भाजपला बालेकिल्ल्यात हा दणका बसला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तर नागपूरमधल्या पराभवाचे विश्लेषण करू, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.