Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जिल्ह्यातील १८ नगरपालिकांचा आज फैसला !
    उत्तर महाराष्ट्र

    जिल्ह्यातील १८ नगरपालिकांचा आज फैसला !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 21, 2025Updated:December 21, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जिल्ह्यातील १८ नगरपालिकांचा आज फैसला !

    सत्ता कुणाची, नगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार?; उत्कंठा शिगेला

    दुपारपर्यंत स्पष्ट होणार चित्र

    जळगाव विशेष प्रतिनिधी जिल्हा मधील 18 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीच्या मतदान दोन डिसेंबर तसेच 20 डिसेंबर रोजी पार पडली असून आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून दुपारपर्यंत बहुतांश निर्णय हाती येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये एकूण आठ लाख 81 हजार पाचशे आठ मतदारा पैकी पाच लाख 78 हजार हून अधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याने जिल्ह्यात जवळपास सरासरी 65.58% इतके मतदान झाले. तसेच काल २० डिसेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात आलेल्या सहा नगर परिषदेतील बारा जागांच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्यात आल्यानंतर माघारी नंतर तीन जागा बिनविरोध झाल्याने नऊ जागांसाठी शनिवारी 20 रोजी मतदान घेण्यात आली या निवडणुकीसाठी एकूण 37 उमेदवार रिंगणात होते जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये 33 हजार 662 मतदारांपैकी 21245 मतदारांनी हक्क बजावल्याने मतदानाची टक्केवारी 63.11 इतकी नोंदविण्यात आली आहे.आज सकाळी सात वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाल्यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान होतो तर कोणाची सत्ता नगरपालिकेत येते याची उत्सुकता सर्वांनाच लागून असून सगळ्यांचीच उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

    जिल्ह्यातील अनेक नगरपालिका क्षेत्रांत यावेळी थेट आणि चुरशीच्या लढती झाल्या असून भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्यात प्रमुख संघर्ष पाहायला मिळाला. मात्र शिवसेना ठाकरे गट , शिवसेना शरद पवार गटाच्या उमेदवारांनी तुल्यबळ लढत दिल्याने अनेक ठिकाणी दुरंगी तिरंगी सामना पहायला मिळाला.

    नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक पद्धत असल्यामुळे अनेक ठिकाणी निवडणूक केवळ राजकीयच नव्हे तर प्रतिष्ठेची ठरली. मुक्ताईनगर, पाचोरा, फैजपूर, नशिराबाद, भडगाव, वरणगाव आणि सावदा येथे दोन प्रमुख पक्षांमध्ये सरळ लढती झाल्या. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून उमेदवार नसल्याने तेथेही भाजप आणि शिंदे गट यांच्यातच स्पर्धा मर्यादित राहिली.

    आज सकाळी ७ वाजेपासून जिल्ह्यातील सर्व १८ ठिकाणी मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. निवडणूक यंत्रणा सज्ज असून सर्व केंद्रांवर आवश्यक सुरक्षा व प्रशासकीय व्यवस्था करण्यात आली आहे. भुसावळ येथे मतदारसंख्या अधिक असल्याने तब्बल १५ फेऱ्यांत मतमोजणी होणार असून निकाल उशिरा अपेक्षित आहे. त्याउलट शेंदुर्णी, रावेर व धरणगाव येथे केवळ दोन फेऱ्यांत मतमोजणी पूर्ण होणार असल्याने या ठिकाणचे निकाल सर्वप्रथम समोर येतील.

    वादग्रस्त घटनांनी निवडणूक गाजली
    जामनेर, मुक्ताईनगर आणि चाळीसगाव येथे मतदानाच्या दिवशी बोगस मतदानाच्या आरोपांवरून कार्यकर्त्यांमध्ये तीव्र वाद झाले होते. काही ठिकाणी पोलिस हस्तक्षेपाची वेळ आली. मुक्ताईनगरमध्ये तर मतदान केंद्रात उमेदवारांच्या प्रवेशावरून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि पोलिस प्रशासनात शाब्दिक संघर्ष झाला.

     

    जिल्ह्यातील गाजलेल्या लढती
    जामनेर नगरपालिकेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या बिनविरोध निवडून आल्या असल्याने नगराध्यक्षपदाची जागा बिनविरोध निशनगरपालिकेत
    पाचोरा नगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे उमेदवार आणि भाजपचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेता वाघ यांच्यात थेट सामना झाला.
    चाळीसगाव नगरपालिकेत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांच्यासमोर शहर विकास आघाडीच्या पद्मजा देशमुख यांनी जोरदार आव्हान उभे केले.
    भुसावळ नगरपालिकेत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे भाजपकडून रिंगणात असून शहर विकास आघाडीने त्यांच्याविरोधात ताकद लावली.

    चोपडा नगरपालिकेमध्ये भाजप–काँग्रेस आघाडी, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट असा तिरंगी संघर्ष येथे रंगला.

    मुक्ताईनगर मध्ये शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील यांना भाजपाकडून थेट आव्हान देण्यात आले. विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांनी येथे शरद पवार गटाचा उमेदवार न देता भाजपाला उघड पाठिंबा मध्ये

    भडगाव नगरपरिषदेत भाजप, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात तिरंगी चुरस निर्माण झाली होती. तसेच अमळनेर ,पारोळा, शेंदुर्णी ,रावेर, सावदा ,फैजपूर आदी नगरपरिषदांच्या निवडणुकीमध्ये रंगतदार चुरस पाहायला मिळाली.

    निवडणूक एक नजर

    जिल्ह्यात १८ नगराध्यक्ष पदांसाठी आणि ४६४ नगरसेवकांच्या जागांसाठी मतदान झाले. ९७७ मतदान केंद्रांवर ८ लाख ८१ हजार ५०८ मतदारांपैकी ५ लाख ९९ हजार ३१३ मतदारांनी मतदान केले. १ हजार ५९० टपाली मतपत्रिकांचाही समावेश आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपाचे १५, शिवसेना शिंदे गटाचे ८, अजित पवार गटाचे ६, ठाकरे गटाचे ४, शरद पवार गटाचे २ आणि काँग्रेसचे २ उमेदवार रिंगणात होते. आज दुपारपर्यंत जिल्ह्याच्या राजकीय नकाशावर कोणाचा झेंडा फडकणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #bhusawal #chalisgaon #muktainagar #pachora #भुसावळ Chopra Faizpur Jamner Raver sindoorni अमळनेर एरंडोल चाळीसगाव चोपडा जामनेर धारंगाव नशिराबाद पाचोरा पारोळा फैजपूर भडगाव मुक्ताईनगर यावल रावेर वरणगाव शेंदुर्णी सावदा
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र

    November 9, 2026

    एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू

    November 9, 2026

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif