दिवाळी स्पेशल रेसिपी ! मैसूर पाक बनवा 15 मिनिटात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

काही दिवसांवर दिवाळी येतेय. दिवाळीमध्ये प्रत्येक जण फराळाचे पदार्थ बनवत असतात. त्यातच गोड पदार्थांना विशेष प्राधान्य असते. मैसूर पाक म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. चला तर मग जाणून घेवूया जाळीदार तोंडात विरघळणारा मैसूर पाक फक्त 15 मिनिटात घरी कसा बनवायचा..

साहित्य

1 कप बेसन , 2 कप साखर , 1 कप पाणी , 3 कप तूप , चिमूटभर बेकींग सोडा, काजू, बदाम आणि पिस्ताचा काप

कृती

पॅनमध्ये एक कप तूप घेऊन मध्यम आचेवर गरम करा . जेव्हा तूप व्यवस्थित तापेल तेव्हा त्यात बेसन घालून काही मिनिटे बेसनाचा वास निघून जाईपर्यंत फ्राय करा .

दुसऱ्या पॅनमध्ये पाण्याबरोबर साखर उकळून साखरेचा पाक तयार करून घ्या. मग त्यात उरलेले तूप घालून गरम होऊ द्या मग फ्राय केलेले बेसन घालून ते घट्ट होईपर्यंत सतत हलवत रहा. जेणेकरून बेसनाच्या गुठळ्या होणार नाहीत. जेव्हा तूप बाजूने सेपरेट होऊ लागेल तेव्हा त्यात बेकिंग सोडा घालून हलवा.

मग सर्वत्र तूप लावलेल्या थाळीत हे मिक्श्चर हलकेच सगळीकडे एक सारखे पसरून गार करायला ठेवा. पूर्ण घट्ट होण्यापूर्वी आवडीप्रमाणे वड्या बनवण्यासाठी चाकूने काप करून घ्या. त्यावर काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप टाका.  हा मूळ मैसूर पाक हा बाजारात मिळणाऱ्या मैसूर पाकपेक्षा वेगळा दिसतो. बाजारातील मैसूर पाकसारखा हा देखील जाळीदार होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.