मुस्लिम मतदारसंघात भाजपचा दरारा !

काँग्रेसचा सुपडा साफ : ‘आप’चा झाडू कोपऱ्यात

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिल्लीतील सर्व 70 जागांवर सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा दिल्लीतील मुस्लिम बहुल जागांवर आहेत. दिल्लीत 13 टक्के मुस्लिम मतदार आहेत. आणि पाच जागांवर मुस्लिम आमदार निवडून आले आहेत. अशा परिस्थितीत, मुस्लिम जागांवरचा ट्रॅक रेकॉर्ड अबाधित राहणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मुस्लिम मतदारसंघात भाजपाने आपला दरारा सिद्ध केला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला असून आपचा झाडूही कोपऱ्यात गेला आहे.

दिल्लीतील मुस्लिम बहुल जागांवर मोठ्या प्रमाणात मतदान झाले. यामध्ये मुस्तफाबाद, बल्लीमारन, सीलमपूर, मतिया महल, चांदणी चौक आणि ओखला या जागांवर मोठ्याप्रमाणावर मतदान झाले आहे. मुस्लिम बहुल जागांवर तीव्र स्पर्धा आहे. दिल्लीतील सीलमपूर, मुस्तफाबाद, मटिया महल, बल्लीमारन आणि ओखला या जागांवर भाजप वगळता सर्व पक्ष मुस्लिम उमेदवार आपले नशीब पणाला लावून आहेत. या जागा मुस्लिम आमदार जिंकत आहेत.ओखला विधानसभा जागेवर एआयएमआयएमकडून शिफा उर रहमान, आम आदमी पक्षाकडून अमानतुल्ला खान, काँग्रेसकडून अरिबा खान आणि भाजपकडून मनीष चौधरी निवडणूक रिंगणात आहेत. या जागेवरून भाजपचे मनीष चौधरी आघाडीवर आहेत.

मुस्तफाबाद मतदारसंघातून एआयएमआयएमचे ताहिर हुसेन, आम आदमी पक्षाचे आदिल खान, काँग्रेसचे अली मेहंदी आणि भाजपचे मोहन सिंग बिश्त निवडणूक लढवत आहेत. येथे भाजपचे उमेदवार मोहन बिष्ट सुमारे 5700 मतांनी पुढे आहेत. बल्लीमारन विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाकडून इम्रान हुसेन, काँग्रेसकडून हारून युसूफ आणि भाजपकडून कमल बंगाडी निवडणूक लढवत आहेत. भाजप येथे सुमारे 200 मतांनी आघाडीवर आहे.

मतिया महल विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाकडून आले मोहम्मद इक्बाल आणि काँग्रेसकडून माजी आमदार असीम मोहम्मद खान निवडणूक लढवत आहेत. दीप्ती इंदोरा भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. सीलमपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून अब्दुल रहमान आणि आम आदमी पक्षाकडून झुबेर अहमद निवडणूक लढवत आहेत, तर भाजपकडून अनिल गौर निवडणूक लढवत आहेत. भाजपचे अनिल शर्मा सुमारे 1325 मतांनी पुढे आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.