Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»गोंधळ करणाऱ्यांना हटकल्याने संगीतकाराची हत्या
    गुन्हे वार्ता

    गोंधळ करणाऱ्यांना हटकल्याने संगीतकाराची हत्या

    पाठलाग करत गाठून मारहाण करून काढाल पळ
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 8, 2026No Comments233 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    दिल्लीत मणिपूरच्या ५४ वर्षीय प्रसिद्ध संगीतकार चोंगथम विक्रम सिंह यांची मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री उशिरा किलोकरी गावात ही घटना घडली. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास विक्रम सिंह कचरा टाकण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरील आपल्या फ्लॅटमधून खाली आले होते. त्यावेळी रस्त्यालगतच्या एका खानावळीतील काही कर्मचारी गोंधळ घालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सिंह यांनी या गोंधळाला आक्षेप घेतल्याने त्यांचा तेथील काही व्यक्तींशी वाद झाला.

    यानंतर परिस्थिती चिघळली. सिंह आपल्या घरी परत जात असताना आठ जणांच्या गटाने त्यांचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. या गटाने तिसऱ्या मजल्यापर्यंत त्यांचा पाठलाग करून कॉरिडॉरमध्ये त्यांना गाठले आणि बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

    दिल्ली पोलिसांना सोमवारी पहाटे १.३८ वाजता घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर विक्रम सिंह यांच्या २० वर्षीय मुलाने त्यांना ओखला येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना सकाळी सुमारे ७ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

    पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पाळत आणि स्थानिक गुप्त माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटविल्याचे सांगितले आहे. मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनीही या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या फुटेजमध्ये कथित हल्ल्यानंतर आठ जण पायऱ्यांवरून खाली जाताना दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे.

    चोंगथम विक्रम सिंह हे पत्नी जोशना चोंगथम आणि मुलगा याइफाबा चोंगथम यांच्यासह किलोकरी गावातील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहत होते. या घटनेमुळे मणिपूरमधील त्यांच्या परिचितांसह संगीत क्षेत्रातही हळहळ व्यक्त होत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!

    October 6, 2026

    राहुल गांधी थेट बॅरिकेड्सवर चढले; पोलिसांकडून…

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif