Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»प्रसिद्ध अभिनेत्याचे अपहरण, २ लाखाची खंडणी वसूल
    मनोरंजन

    प्रसिद्ध अभिनेत्याचे अपहरण, २ लाखाची खंडणी वसूल

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 11, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अभिनेता मुश्ताक खान यांचं अपहरण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. एका कार्यक्रमाचं नाव सांगून मला बोलावण्यात आलं आणि त्यांचं अपहरण झालं असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांचा बिझनेस पार्टनर शिवम यादव यांनी केला आहे. तसेच अपहरण करणाऱ्या टोळीने मुश्ताक यांची सुटका करण्यासाठी दोन लाख रुपयांची खंडणीही गोळा केला असल्याचं त्यांनी सांगितलं.

    त्यांचे पार्टनर शिवम यादव म्हणाले की, मुश्ताकला 20 नोव्हेंबर रोजी मेरठमध्ये एका अवॉर्ड शोसाठी बोलावण्यात आले होते. त्यासाठी त्याला आगाऊ रक्कमही देण्यात आली होती. यानंतर त्यांना विमानाचे तिकीटही पाठवण्यात आले. दिल्लीत उतरल्यावर त्याला कारमध्ये बसवून दिल्लीच्या बाहेरील बिजनौरजवळ कुठेतरी नेण्यात आले.

     

    १२ तास कैदेत 

    अपहरणकर्त्यांनी मुश्ताक खानला सुमारे 12 तास कैद केले. त्याच्याकडून खंडणी म्हणून एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. यानंतर अपहरणकर्त्यांनी मुश्ताक आणि त्याच्या मुलाच्या बँक खात्यातून दोन लाखांहून अधिक रुपये काढले. जेव्हा अभिनेत्याने सकाळच्या अजानचा आवाज ऐकला तेव्हा त्याला समजले की जवळच एक मशीद आहे. अशा स्थितीत तो तेथून निसटला आणि पोलिसांच्या मदतीने घरी परतला.

    गुन्हा दाखल

    मुश्ताक आणि त्याचे कुटुंब त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराने हादरले होते. मात्र, स्वत:ला शांत करून एफआयआर दाखल केली आहे.  मी स्वत: बिजनौरला जाऊन अधिकृत एफआयआर दाखल केला. आमच्याकडे विमानाची तिकिटे, बँक खाती आणि विमानतळाजवळील सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा आहे, अगदी त्याला जिथे ठेवले होते ते घरही अशी सगळी ओळखही तो करु शकतो.

    Mushtaq Khan Kidnapped
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गरजू पाल्यांसाठी विनामूल्य नियमित ‘कथक’ प्रशिक्षण वर्ग

    May 17, 2026

    ‘कला संस्कार शिबिरा’साठी जळगावचा बालचमू कोल्हापूर रवाना

    May 10, 2026

    पारंपारिक लोककला व संस्कृती टिकवण्यासाठी कलाकार जपला पाहिजे!

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif