Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»हृदयद्रावक : आईला फोन करून घरी येतो सांगितले, अन् अर्ध्या तासात काळाने घात केला !
    गुन्हे वार्ता

    हृदयद्रावक : आईला फोन करून घरी येतो सांगितले, अन् अर्ध्या तासात काळाने घात केला !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 18, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हृदयद्रावक : आईला फोन करून घरी येतो सांगितले, अन् अर्ध्या तासात काळाने घात केला !

    कार टँकरला धडकल्याने दुर्दैवी अपघात, आईचा आक्रोश हृदय पिळवटणारा

    मूर्तिजापूरजवळ झालेल्या अपघातात जळगावातील महिलेचा मृत्यू

    जळगाव – “आई, आम्ही निघालोय, थोड्याच वेळात घरी पोहोचू,” हा संवाद संपताच अवघ्या अर्ध्या तासात काळाने घाला घातला! पराग आणि अल्पना लिमये अभयारण्यातील सुंदर आठवणी घेऊन परतत होते. मात्र, नियतीला काही औरच मंजूर होते. १६ मार्च रोजी मूर्तिजापूरजवळ कार उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरवर आदळली आणि अल्पना लिमये (वय ५६, रा. रिंगरोड, जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. १६ मार्च रोजी दुपारी तीन वाजता अल्पना यांनी आईला घरी निघाल्याचा फोन केला होता.

    प्रवास आनंदाचा, शेवट वेदनादायक

    पराग लिमये हे व्यावसायिक असून, ते पत्नी अल्पना, मुलगा आणि सून यांच्यासह अभयारण्यात गेले होते. निसर्गाचा आनंद घेत ते घरी परतत होते. घरी पोहोचण्याच्या आनंदात अल्पना यांनी आईला फोन करून “आम्ही निघालोय,” असे सांगितले. मात्र, काही मिनिटांतच त्यांच्या आयुष्याची गाडी काळाच्या गर्तेत हरवली.

    अपघात इतका भीषण की क्रेनशिवाय शक्य नव्हते…

    मुर्तीजापूरजवळ भरधाव कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टँकरवर जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की, कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला आणि अल्पना लिमये या जागीच ठार झाल्या. पराग लिमये गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांनी दुसऱ्या कारमधील मुलाला फोन करून माहिती दिली. मदतीसाठी धाव घेतलेल्या कुटुंबीयांसाठी हे दृश्य हृदय हेलावणारे होते. कारमध्ये अडकलेल्या अल्पना यांना बाहेर काढण्यासाठी क्रेन लावावी लागली.

    आईच्या डोळ्यांसमोर मुलीचा मृतदेह… आक्रोशाने आसमंत दणाणला!

    अपघाताच्या काही वेळापूर्वीच अल्पना यांनी आपल्या आईला फोन केला होता. “मुलगी आता येते,” या आशेने आईने वाट पाहिली, पण घरात आलेला आवाज आनंदाचा नव्हता, तर करुण हंबरडा फोडणारा होता. मुलीच्या मृतदेहासमोर उभ्या असलेल्या आईने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. घरातील प्रत्येकाला दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखे वाटत होते.

    या भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातातून वाचलेल्या पराग लिमये यांच्यावर उपचार सुरू आहेत.अल्पना लिमये या शालेय जीवनापासून खो-खो, बॅडमिंटनपटू म्हणून ओळखल्या जात. विविध स्पर्धामध्ये त्यांनी यशही मिळविले. याशिवाय विविध प्रकारच्या बॅग तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय होता.

     

    #crime accident Akola jalgaon Murtijapur
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif