Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ कारणावरून हत्या
    गुन्हे वार्ता

    दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ कारणावरून हत्या

    मंगळूरूला पळून जाणार होता आरोपी : त्याआधीच बेड्या
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 26, 2026No Comments547 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    लोकल ट्रेनचा दरवाजा बंद करण्यासारखा शुल्लक वादावरून एखाद्याचा जीव जाईल याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण पश्चिम रेल्वे मार्गावर मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेने सगळेच हादरले. बोरीवली लोकल ट्रेनमध्ये रोशन सुवर्णा याचा मयंक लोहारशी वाद झाला आणि पाहता पाहता तो पेटला. रागाच्या भरात रोशन याने बॅगेतून चाकू काढला आणि मयंकच्या पोटावर, छातीवर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेला मयंक रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला आणि काही वेळातच मृत्यू झाला. या खुनानंतर फार झालेल्या रोशन सुवर्णा याला पोलिसांनी 24 तासांच्या पनवेलमधून अटक करत बेड्या ठोकल्या.

    पोलिस चौकशीत अनेक महत्वाचे खुलासे झाले असून एक धक्कादायक अपडेटही समोर आली आहे. आरोपी रोशन याने मयंकवर ज्या चाकून वार केला, त्याला तो चाकू कुठून मिळाला, त्याच्या बॅगेत तो कसा आला याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्याबाबत रोशन याने स्वत: माहिती दिली आहे. रोशन सुवर्णा याला तो चाकू ॲमेझॉनमध्ये काम करणाऱ्या त्याच्या मित्राने दिला होता. काही दिवसांपूर्वी आरोपीच्या मित्राने घरकामासाठी म्हणून हा चाकू त्यावा दिला होता. मात्र आरोपीने तो बॅगेतच ठेवला आणि तो त्याबाबत विसरला. मात्र मंगळवारी रात्री वाद झाला त्यावेळी अचानक त्याला बॅगेत चाकू असल्याचे लक्षात आले. तोच चाकू त्याने बॅगेतून काढला आणि मयंकवर वार केले.

    हत्येनंतर आरोपी बोरिवली स्थाकात उतरून पसार झाला होता. सीसीटीव्हीत अनेक ठिकाणी तो दिसला, त्यानंकतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. रोशन याच्या शर्टवरील चिन्हाशिवाय अंधेरी आणि मिरा रोड रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजमधूनही पटली. त्यानंतर पोलिस हे मिरा रोड येथील आरोपीच्या घरी पोहोचले, तोपर्यंत तो घरातून फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबियांमारफकत आरोपीशी बोलणं केलं, त्यानंतरच त्याने शरण येण्यास होकार दिल्याची माहिती समोर आली.

    मुंबई लोकल ट्रेनमध्ये मयंकची हत्या केल्यानंतर आरोपी रोशन हाँ मंगळुरूला पळून जायच्या तयारीत होता , अशी माहिती पोलीस तपासात सदर माहिती उघडकीस आली . आरोपी रोशन सुवर्णाने मंगळुरूला पळून जाण्यासाठी बसचं तिकिटही काढलं होतं. मात्र त्याआधीच पोलिसांनी त्याचा तपासाची चक्र वेगाने फिरवत त्याला शोधून काढलं आणि पनवेल येथून अटक केली.

    तो पळून जाण्याआधी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. अटक झाल्यानंतर आरोपी रोशन याने पोलिसांना पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे, मयंक जिवंत आहे का? त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असं पोलिसांनी सांगितलं. मात्र तरीही आरोपी रोशन सुवर्णा याने इंटरनेटवर याबाबत सर्च केलं असता मयंकचा मृत्यू झाल्याचं त्याला समजलं. मात्र ही बातमी चुकीची आहे, असं पोलिसांनी त्याला सांगितलं. आरोपीने गोंधळून जाऊन चुकीचं काही करू नये यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतल्याचं दिसून आलं. अखेर त्याला बोरिवली पोलिस स्टेशनला आणल्यावर पोलिसांनी त्याला मयंकचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif