Thursday, May 26, 2022

खंडणीसाठी ‘त्या’ ८ वर्षाचा मुलाचा खून

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

पिंपरी :खंडणीसाठी  ‘त्या’ ८ वर्षाचा मुलाचा खून . चिखली येथे आठ वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाने सखोल चौकशी केली.

- Advertisement -

सुरुवातीला आरोपीने लैंगिक अत्याचार करताना मुलाचा खून केल्याचे सांगितले. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच एक लाखांच्या खंडणीसाठी खून केल्याची कबुली आरोपीने दिली.

बपील अहमद रईस लष्कर (26, सध्या रा. कुदळवाडी, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लक्ष्मण बाबूराम देवासी (वय 8, रा. हरगुडे वस्ती, चिखली) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

बपील अहमद हा मूळचा आसाममधील सिलचर जिल्ह्यातील आहे. आरोपीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला होता, अशी चर्चा होती. आरोपीने देखील तशी कबुली दिली होती. अखेर पोलिसांनी खाक्या दाखविल्यावर त्याने खंडणीसाठी अपहरण केल्याची कबुली पोलिसांना दिली.

आरोपी बपील अहमद याने सीएनसी प्रोग्रामिक केले होते व सध्या तो तळेगाव येथे ऑपरेटर म्हणून कामाला होता. सध्या त्याला 18 ते 20 हजार रुपये पगार होता.

मात्र, परदेशात गेल्यावर त्याला जादा हजार पगार मिळणार होता. त्यासाठी त्याला पासपोर्ट, व्हिसा आणि तिकीटासाठी एक लाख रुपयांची आवश्यकता होती.

लक्ष्मण याचे अपरहरण करून तो त्यांच्या आई-वडिलांकडे एक लाखांची खंडणी मागणार होता. घडाळ्याचे अमिष दाखवून त्याने लक्ष्मणला काही अंतर नेले. मात्र, मुलाच्या पायात काटा मोडल्याने तो खाली पडला. तो रडू लागल्याने त्यास पडक्या जागेत नेऊन दगडाने ठेचून त्याचा खून केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या